शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम-किसान’ योजना : लाखावर अर्ज अपलोड ; पण किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:27 IST

अर्ज केलेल्या काही मोजक्याच शेतकºयांना बँक खात्यात मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचे ‘एसएमएस’ आले

- संतोष येलकरअकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९०२ शेतकºयांचे अर्ज गत १५ फेबु्रवारीपर्यंत शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अर्ज केलेल्या काही मोजक्याच शेतकºयांना बँक खात्यात मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचे ‘एसएमएस’ आले असून, उर्वरित बहुतांश शेतकºयांना रक्कम जमा झाल्याचे ‘एसएमएस’ अद्याप आले नाही. त्यामुळे लाखावर शेतकºयांचे अर्ज अपलोड करण्यात आले असले, तरी त्यापैकी किती शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात शासनामार्फत करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनामार्फत गत १५ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या १ लाख १५ हजार ९०२ शेतकºयांचे अर्ज शासनाच्या ‘पीएम-किसान पोर्टल’वर अपलोड करण्यात आले. शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मदतीच्या सहा हजार रुपयांपैकी पहिल्या हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया गत फेबु्रवारीअखेर शासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये मदतीच्या पहिल्या हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे ‘एसएमएस’ जिल्ह्यातील काही मोजक्याच शेतकºयांना आले. उर्वरित बहुतांश शेतकºयांना मात्र मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचे ‘एसएमएस’ अद्यापही आले नाही. त्यामुळे पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्ष सहा हजार रुपये मदतीसाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९०२ शेतकºयांनी अर्ज केले असले, तरी त्यापैकी किती शेतकºयांच्या खात्यात मदतीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुकानिहाय अर्ज केलेले असे आहेत शेतकरी!तालुका                 शेतकरीअकोला                 १७२७२बार्शीटाकळी           १५६८२अकोट                   २०९८०तेल्हारा                 १८४३९बाळापूर                १६२६७पातूर                    १३४१९मूर्तिजापूर             १३८४३..............................................एकूण                    ११५९०२

 

टॅग्स :AkolaअकोलाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी