नवरदेवाच्या घरात लुटपाट

By Admin | Updated: May 11, 2014 00:10 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:10:04+5:30

गायगावात दोन गटात हाणामारी

Plunder in the house of Nawarda | नवरदेवाच्या घरात लुटपाट

नवरदेवाच्या घरात लुटपाट

बाळापूर - तालुक्यातील गायगाव येथे दोन समाजात झालेल्या वादाचे पर्यवसान लुटमारीत झाले. या घटनेत दोन्ही गटातील चार जण जखमी झाले आहे. डीजेची गाडी काढण्यावरू न हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाची माहिती अशी की, गायगावात रामदास बघे यांच्याघरी नानमुखाचा कार्यक्रम होता. सायंकाळी नवरदेव निघणार असल्यामुळे डीजेची गाडी घेण्यासाठी लग्नघरची काही मंडळी गायगाव स्टँडवर आली होती. दरम्यान दुसर्‍या गटातील गाडी आणि डीजेची गाडी समोरासमोर आल्याने वाद झाला. यानंतर लग्नातील वर्‍हाडी मंडळी बसस्टँडच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच विरू ध्द पक्षाच्या लोकांनी काठ्या,पाईप व शस्त्रासह नवरदेवाच्या घरावर धावा बोलला. यामध्ये महिला व लहान मुले जखमी झालेत. गावगुंडांनी नवरदेवाच्या घरातील मंडळींना मारहाण करू न त्यांच्या घरातील ऐवज लुटला. दोन्ही गटाच्यावतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्यराखीव दलाची एक तुकडी गायगावात डेरेदाखल झाली आहे. 

Web Title: Plunder in the house of Nawarda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.