शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अकोल्यातील भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:43 IST

 अकोला - शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड घोटाळयात अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळयातील मुख्य आरोपी दिपक रमेश झांबड आणि रमेश गजराज झांबड या दोघांना शनिवारी सकाळी अकोल्यात बेडया ठोकल्या.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी शनिवारी दीपक झांबड व रमेश झांबड या दोन्ही आरोपींना अटक केली.शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात हेरफेर करून बळकावला होता.‘लोकमत’ने वृत्तमालिका चालवून आणले होते प्रकरण उघडकीस.

सचिन राऊत

 अकोला - शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड घोटाळयात अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळयातील मुख्य आरोपी दिपक रमेश झांबड आणि रमेश गजराज झांबड या दोघांना शनिवारी सकाळी अकोल्यात बेडया ठोकल्या. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २० कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात आॅनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपून घोटाळा करण्यात आला होता. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले, तसेच पाठपुरावा केल्यानंतर याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अमर डिकाव यांनी तक्रार केली; मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला; मात्र पिता-पुत्राने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ केली. जिल्हा व सत्र न्यायालयाने झांबड पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघेही फरार झाले होते, मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी शनिवारी दीपक झांबड व रमेश झांबड या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.आता अधिकारी-कर्मचाºयांवर गडांतरभुमी अभिलेख विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांचे नावे आता उघड होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यानंतर २० कोटी रुपयांच्या या घोटाळयात सहभागी असलेल्या भुमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांनाही बेडया ठोकण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाPoliceपोलिस