बियाणे, खत पुरवठय़ाचा आराखडा
By Admin | Updated: April 27, 2015 01:44 IST2015-04-27T01:44:09+5:302015-04-27T01:44:09+5:30
९८ हजार क्विंटल बियाणे; ९२ हजार मेट्रिक टन खत पुरवठा करणार.

बियाणे, खत पुरवठय़ाचा आराखडा
संतोष येलकर /अकोला: येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील अपेक्षित पेरणीचे क्षेत्र आणि बियाणे, कीटकनाशके व खतांच्या पुरवठय़ाचा आराखडा कृषी विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाणे आणि ७२ हजार ४00 मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या पृष्ठभूमीवर खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अपेक्षित पेरणीचे क्षेत्र, पेरणीसाठी मागणीनुसार शेतकर्यांना लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या पुरवठय़ाबाबत आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ात सरासरी ४ लाख ८२ हजार ६२0 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, त्या तुलनेत यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ५५ हजार १00 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. खरीप पेरणीसाठी जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाण्याची गरज प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वार, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच खरीप हंगामात जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७२ हजार ४00 मेट्रिक टन विविध खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.