मळणीयंत्राची योजना ९0 टक्के अनुदानावर राबवा!
By Admin | Updated: October 28, 2014 00:23 IST2014-10-28T00:23:16+5:302014-10-28T00:23:54+5:30
अकोला जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शिफारस.

मळणीयंत्राची योजना ९0 टक्के अनुदानावर राबवा!
अकोला : शेतकर्यांसाठी राबविण्यात येणारी मळणीयंत्र वाटपाची योजना ७५ टक् क्यांऐवजी ९0 टक्के अनुदानावर राबविण्यात यावी, अशी शिफारस जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत सोमवारी करण्यात आली. यासंबधी घेण्यात आलेला ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकर्यांना मळणीयंत्र वाटपाची योजना यावर्षी राबविण्यात येत आहे. ३0 लाखांची ही योजना असून, या योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानाऐवजी ९0 टक्के अनुदानावर शेतकर्यांना मळणीयंत्रांचे वाटप करण्यात यावे,अशी शिफारस करणारा ठराव कृषी सभेत घेण्यात आला. हा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याचे ठरविण्यात आले असून, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शे तकर्यांकडून अर्ज मागविण्याच्या सूचनादेखील सभेत देण्यात आल्या. ज्या शेतकर्यांकडे बोअरची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकर्यांसाठी ३0 लाखांचे सबर्मसिबल पंप वाट पाची योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ९0 टक्के अनुदानावर शेतकर्यांना सबर्मसिबल पंप वाटपासाठी लाभार्थी शेतकर्यांकडून अर्ज मागविण्याचे या सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला समिती सदस्य मंजुळा लंगोटे, शबाना खातून खान, रेणुका दातकर, माधुरी कपले, रेखा अंभोरे, देवका पातोंड, डॉ. हिंमत घाटोळ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.