सोयाबीनचे नियोजन;बियाणे पाठवले बाजारात
By Admin | Updated: May 12, 2014 19:46 IST2014-05-12T18:59:29+5:302014-05-12T19:46:16+5:30
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने सात हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून, तीन हजार क्विंटल बियाणे बाजारात पाठवले आहे.

सोयाबीनचे नियोजन;बियाणे पाठवले बाजारात
अकोला : जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांची गरज बघता, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने सात हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून, तीन हजार क्विंटल बियाणे बाजारात पाठवले आहे.
यावर्षी सोयाबीनचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्यामुळे महाबीजने दक्षता घेणे सुरू केले आहे. असे असले तरी सोयाबीन बियाणे कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कापूस या पिकासह इतर नगदी पिकांची पेरणी करण्याची गरज असल्याचे आव्हान सर्वच पातळीवर केले जात आहे. तथापि, सोयाबीन हे कमी खर्चाचे पीक असल्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली. अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत गेले होते. तथापि, या वर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत साशंकता वर्तविली जात असल्यामुळे शेतकर्यांपुढे सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे; परंतु महाबीजने या बियाण्यांची तजवीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी सात हजार क्विंटल सोयाबीन बोलावले आहे. यातील तीन हजार क्विंटल बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करू न दिले आहे. उर्वरित सोयाबीनचे ट्रक जिल्हा महाबीज कार्यालयात येऊन पोहोचले आहेत. एक-दोन दिवसात हे बियाणेदेखील बाजारात उपलब्ध करू न दिले जाणार आहे.
सोयाबीन बियाण्यांच्या अनिश्चिततेमुळे जिल्ातील शेतकरी कापूस पिकाचे नियोजन करीत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी कंपन्यांच्या स्पर्धेत महाबीजने १००० पाकिटे कापसाचे बियाणे बाजारात आणले आहे. असे असले तरी शेतकर्यांची पसंती ही इतर बीटी कापूस कंपन्यांकडे आहे. त्यामुळे काही शेतकर्यांनी कापूस बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे.