शेतमजूर महिलांना शेती अवजारे वाटपाचे नियोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 14:24 IST2019-08-24T14:23:56+5:302019-08-24T14:24:17+5:30
लाभार्थी शेतमजूर महिलांकडून १० सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे निर्देश ‘सीईओं’नी दिले.

शेतमजूर महिलांना शेती अवजारे वाटपाचे नियोजन!
अकोला : जिल्ह्यातील शेतमजूर महिलांना ९० टक्के अनुदानावर शेती अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतमजूर महिलांना शेती अवजारांचे वाटप करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी लाभार्थी शेतमजूर महिलांकडून १० सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे निर्देश ‘सीईओं’नी दिले.
जिल्ह्यातील शेतमजूर महिलांना ९० टक्के अनुदानावर शेती अवजारांचे वाटप करण्याची योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत शेती अवजारांचे वाटप करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. शेतमजूर महिलांना अनुदानावर शेती अवजारांचे वाटप करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत लाभार्थी शेतमजूर महिलांचे अर्ज गाव पातळीवर स्वीकारण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. या बैठकीला जिल्हा परिषद महिला व बालकल्याण, कृषी विभागाच्या अधिकाºयांसह महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.