चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा

By Admin | Updated: September 1, 2014 01:40 IST2014-09-01T01:39:57+5:302014-09-01T01:40:20+5:30

अकोल्यात चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा.

Pistol smuggling started four years ago | चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा

चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा

नितीन गव्हाळे / अकोला
पिस्तूल तस्करीप्रकरणी शनिवारी गजाआड केलेला अमोल साळवे (२५) याने चार वर्षांपूर्वी पिस्तूल, देशीकट्टा तस्करीचा गोरखधंदा सुरू केला. त्यासाठी त्याने नात्यातीलच मित्रमंडळींची टोळी करून, त्यांनाही पैशांचे आमिष दाखवून या गोरखधंद्यामध्ये आणल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शिवणीतील अमोल साळवे, उमेश जोंधळे, उमेश सोळंके, राजकुमार यादव, अमोल जामनिक, पवन गावंडे आणि राहुल शर्मा या सात जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीच्या तीन पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले होते. या टोळीचा म्होरक्या अमोल साळवे हा असून, तो गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याने, त्याचे अनेकदा मध्य प्रदेशात जाणे-येणे सुरू झाले. गुन्हेगारांना असलेली शस्त्रांची निकड पाहून, त्याने शस्त्र तस्करीची शक्कल लढविली आणि तस्करीच्या धंद्यात आपले पाय घट्ट रोवले. मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये फिरून त्याने तेथील शस्त्र विक्री करणार्‍या व्यक्तींसोबत ओळख निर्माण केली. संपर्क वाढवला. यातूनच त्याला ४ ते ५ हजार रुपयांमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व देशीकट्टे मिळू लागले; परंतु हे शस्त्रे विकायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी त्याने लोहगडचा उमेश जोंधळे व कोळासा येथील उमेश सोळंके यांना हाताशी धरले. पुढे अमोल जामनिक याच्याकडे ग्राहक शोधून आणण्याचे काम दिले. तसेच शहरातील पवन गावंडे व राहुल शर्मा हेही त्याच्या संपर्कात आले. हे दोघे शस्त्र खरेदीमध्ये मध्यस्थ म्हणून साळवेसाठी काम करू लागले. साळवेने मध्य प्रदेशातून ४ ते ५ हजार रुपयांमध्ये आणलेले पिस्तूल व देशीकट्टे १0 ते २0 हजार रुपयांमध्ये विकून, त्यातून प्राप्त झालेल्या पैशांमधून आपले कमिशन या युवकांना मिळू लागल्याने, त्यांचाही जम बसला.
*शस्त्र विक्रीच्या कमिशनमधून महागड्या मोटारसायकली
अमोल जामनिक व उमेश जोंधळे यांनी मिळत असलेल्या हजारो रुपयांच्या कमिशनमधून एक ते सव्वा लाख रुपये किमतीच्या मोटारसायकली घेतल्याचेही समोर आले. पोलिसांनी या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उमेशच्या मोटारसायकलवर तर स्पेशल नंबर २११४ आहे. या आकड्यामधून ह्यशामह्ण नाव तयार होते. त्याने नंबरप्लेटवर २११४ आकड्यांचे अक्षरांमध्ये रूपांतर करून मोटारसायकलवर ह्यशामह्ण हे नाव टाकले आहे.
*आरोपींकडून आणखी पिस्तूल मिळण्याची शक्यता
पोलिस कोठडीदरम्यान आरोपी अमोल साळवे, उमेश जोंधळे, उमेश सोळंके व अमोल जामनिक यांच्याकडून आणखी पिस्तूल व देशीकट्टे मिळण्याची शक्यता आहे. गत चार वर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यामध्ये त्यांनी किती गुन्हेगारांनी पिस्तूल, देशीकट्टे व जिवंत काडतूस उपलब्ध करून दिले. याची माहितीही पोलिस घेणार आहेत.
*आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत कोठडी
स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्‍वर फड यांनी सातही आरोपींना रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाकडे त्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Pistol smuggling started four years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.