पिंजर पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:01+5:302021-05-06T04:20:01+5:30

पिंजरचे ठाणेदार महादेवराव पडघान यांनी दोनद येथे तर महान पोलीस चौकी पीएसआय विकास राठोड यांनी बुधवारी विविध ठिकाणच्या ...

Pinjar police raid a village liquor den | पिंजर पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा

पिंजर पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा

पिंजरचे ठाणेदार महादेवराव पडघान यांनी दोनद येथे तर महान पोलीस चौकी पीएसआय विकास राठोड यांनी बुधवारी विविध ठिकाणच्या गावठी दारू अड्ड्यावर छापा घातला. दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात आरोपी संतोष काशीकर हा गावठी दारू गाळत असल्याची माहिती ठाणेदार पडघान यांना मिळाली. त्यांनी दारू अड्ड्यावर छापा घालून ११ लिटर गावठी दारू, सडवा मोहमाच, दारू गाळण्याचे साहित्य जप्त करून आरोपी संतोष काशीकर यास अटक केली. पीएसआय विकास राठोड, हेकॉ. चव्हाण, एनपीसी भिकासिंग जाधव, पोकॉ. भगवान शिंदे, रोशन पवार यांनी भेंडी महाल येथील सत्यपाल मोहन राठोड(२६) याच्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून १० लिटर गावठी दारू, ६ डब्बे सडवा मोहमाच मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

फोटो: ईएमएस

Web Title: Pinjar police raid a village liquor den