अकोटात मृतावस्थेत कबुतरे आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST2021-03-01T04:21:40+5:302021-03-01T04:21:40+5:30

अकोट शहरात दुसरे टप्प्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अकोट प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहे. अशातच गत ...

Pigeons were found dead in Akota | अकोटात मृतावस्थेत कबुतरे आढळली

अकोटात मृतावस्थेत कबुतरे आढळली

अकोट शहरात दुसरे टप्प्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अकोट प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहे. अशातच गत दोन दिवसांपासून अंजनगाव मार्गावरील वस्तीत कबुतरे मृतावस्थेत आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (फोटो)

-------------------------------

संत रविदास महाराज जयंती उत्साहात

अकोटः शहरात संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील बस स्थानकात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. समाजबांधव निवासस्थानी व नगरपरिषदेत संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोट शाखा अध्यक्ष रवि मालखेडे, गजानन डामरे, धामणे, सुधाकर पिंजरकर, राजू पिंजरकर, हरिश्चंद्र डामरे, रवी मालखेडे, गोकुळ पानझाडे, जवाहरजी राजदे, विजय धुमाळे, अनिल बुदिले, रमेश गवई, लखन पटके, वैभव खंडारे, संदीप देउलकर, मनीष लोंढे, डॉ.कैलास मालखेडे, मंगेश पटके, तसेच एसटी कर्मचारी वैभव खंडारे, विनोद भाकरे, देवा घोडे आदी उपस्थित होते. (फोटो)

---------------------------------

Web Title: Pigeons were found dead in Akota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.