शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

सवलतीच्या दरातील धान्याची होईना उचल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:10 IST

८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ या सवलतीच्या दरातील धान्याची उचल केशरी शिधापत्रिकाधारकांकडून होत नसल्याचे वास्तव मंगळवारी समोर आले आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीप्रमाणे केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक लाभार्थींनाही २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदळाचे वितरण अपेक्षित असल्याने, जिल्ह्यात ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ या सवलतीच्या दरातील धान्याची उचल केशरी शिधापत्रिकाधारकांकडून होत नसल्याचे वास्तव मंगळवारी समोर आले आहे.‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा प्रति लाभार्थीला पाच किलो मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीव्यतिरिक्त ज्यांना रास्त भाव दुकानांमधून दरमहा धान्य मिळत नाही, अशा केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत शासनामार्फत सवलतीच्या दरात ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदळाचे वितरण रास्त भाव दुकानांमधून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीं कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा सवलतीच्या दरात ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना गत २४ एप्रिलपासून रास्त भाव दुकानांमधून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे; मात्र प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीप्रमाणे २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ मिळत नसल्याने, रास्त भाव दुकानांमधून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील धान्याची उचल केशरी शिधापत्रिकाधारकांकडून होत नसल्याचे वास्तव ५ मे रोजी समोर आले आहे.११ दिवसांत केवळ २११३ क्विंटल धान्य वितरित!जिल्ह्यात ५ लाख २१ हजार १२१ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी असून, या लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी १५ हजार ४०० क्विंटल गहू व १२ हजार क्विंटल तांदळाचा साठा मंजूर करण्यात आला. गत २४ मार्चपासून रास्त भाव दुकानांमार्फत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. ५ मे पर्यंत ११ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १० टक्के लाभार्थींना २ हजार ११३ क्विंटल धान्याचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये १ हजार २४८ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदूळ वितरणाचा समावेश आहे. धान्य वितरणाचे अत्यल्प प्रमाण बघता जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांकडून सवलतीच्या दरातील धान्याची उचल होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.सवलतीच्या दरातील अन्य वितरणात जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून धान्याची उचल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ५ मेपर्यंत जिल्ह्यात १ हजार २४८ क्विंटल गहू व ८६५ क्विंटल तांदळाची उचल लाभार्थीकडून करण्यात आली आहे. केवळ १० टक्के लाभार्थींनीच धान्याची उचल केली आहे.- बाबाराव काळे, जिल्हा पुरवठा अधिकारीप्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीप्रमाणे २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ मिळत नसल्याने केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून सवलतीच्या दरातील धान्य वितरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शासनामार्फत सवलतीच्या दरात मिळणाºया धान्याचा केसरी शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला पाहिजे.- शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना.

 

टॅग्स :Akolaअकोला