फुले-आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटनेने दिले धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:38+5:302021-07-17T04:15:38+5:30

अकोला: जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे ऑडिट करून, सक्तीने शिक्षण शुल्क (फी) घेतल्याचे आढळल्यास संबंधित शाळांची मान्यता ...

Phule-Ambedkari Student Youth Association | फुले-आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटनेने दिले धरणे!

फुले-आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटनेने दिले धरणे!

अकोला: जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे ऑडिट करून, सक्तीने शिक्षण शुल्क (फी) घेतल्याचे आढळल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी फुले-आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटना, अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांचे ऑडिट करून त्यामध्ये सक्तीने शिक्षण शुल्क घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, कोरोना काळातील तसेच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे, आरटीई अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी फुले, आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटना, अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात फुले-आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र भोजने यांच्यासह जयप्रकाश दामोदर, तुषार पुंडे, चंद्रशेखर नकाशे, मनीष सावळे, प्रभाकर वानखडे, जीवन दारोकार, संतोष ढोले, विशाल गव्हांदे, पंकज वाढवे, पंकज खंडारे, सिद्धार्थ शिरसाट, ओम धामोळे, अंकुश सुरत्ने, गाेपाल वाफदाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

..................फोटो......................

Web Title: Phule-Ambedkari Student Youth Association