कुंभारीच्या पाणवठय़ावर ‘थापट्या’चे दर्शन

By Admin | Updated: February 11, 2015 01:20 IST2015-02-11T01:20:24+5:302015-02-11T01:20:24+5:30

अकोल्याजवळील कुंभारी पाणवठय़ावर स्थलांतरीत पक्षांची मांदियाळी.

The philosophy of 'Thapatya' on the waterfall of the potter's waterfall | कुंभारीच्या पाणवठय़ावर ‘थापट्या’चे दर्शन

कुंभारीच्या पाणवठय़ावर ‘थापट्या’चे दर्शन

अकोला - शहरालगत असलेल्या कुंभारीचा पाणवठा आता पक्षीसंपदेने फुलतो आहे. विविध जातींचे पाणपक्षी, शिकारी पक्षी, माळरानावरील पक्षी, चिखले अशा द्विजगणांना हा तलाव खूपच आवडू लागला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खरपी बदकाने पक्षीमित्रांना सुखावले होते. आता या पाणवठय़ावर थापट्या या रानबदकाच्या दर्शनाने पक्षीमित्र पुन्हा सुखावले आहेत. पक्षीमित्र दीपक जोशी, डॉ. मिलिंद चौखंडे आणि रवी घोंगळे हे रविवारी कुंभारीच्या पाणवठय़ावर पक्षी निरीक्षणासाठी गेले असताना त्यांना या थापट्याचे दर्शन झाले. थापट्या बदक तसा सगळय़ा पाणपक्ष्यांच्या आधी आपल्या परिसरात येणारा आणि हिवाळा संपला तरी उशिराने परतीचा प्रवास करणारा. युरोप, सैबेरियातून येणारा हा पक्षी त्याच्या पसरट चोचीमुळे चटकन ओळखता येतो. या देखण्या पक्ष्याची छाती पांढरी असते. पोटाचा भाग गर्द रक्ताळल्या सारखा तांबडा असतो. टोकाशी पसरट होत गेलेली विचित्र वाटणारी चोच त्याला पाण्यातून आपलं खाद्य शोधण्यास उपयुक्त ठरते.

Web Title: The philosophy of 'Thapatya' on the waterfall of the potter's waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.