पेट्रोल पंप दरोड्यातील टोळी जेरबंद
By Admin | Updated: August 25, 2014 03:14 IST2014-08-25T03:09:06+5:302014-08-25T03:14:40+5:30
पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्या टोळीला रविवारी अकोला गुन्हे शाखेने जेरबंद केले.

पेट्रोल पंप दरोड्यातील टोळी जेरबंद
अकोला - आकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्या टोळीला रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. यामधील पाचही दरोडेखोर आकोट फैलमधील रहिवासी असल्याचे समोर आले असून, मुद्देमाल व शस्त्र सोमवारी जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आकोट रोडवर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटल्याची घटना १६ जुलै रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली होती. या दरोड्यातील आरोपी संजय पांडुरंग जोगदंड, राकेश अनिल कैथवास, विलास प्रकाश चव्हाण, राहुल लक्ष्मण खरे व सुरज रामचरण कलाणे या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी आकोट फैल परिसरातून अटक केली. या दरोड्यादरम्यान या पाचही आरोपींनी पेट्रोल पंपावर कार्यरत असलेले गांधीग्राम येथील रहिवासी अजय काठोडे व विजय चव्हाण या दोन कर्मचार्यांना मारहाण केली होती. त्यानंतर या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला.
या दरोडा प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी संशयावरून चार युवकांना ताब्यात घेतले होते. या युवकांची चौक शी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पाचही दरोडेखोरांना जेरबंद केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख प्रमोद काळे, पीएसआय डी.एन. फड, शिवसिंह डाबेराव, संतोष गवई, मनोहर मोहोड, संतोष चिंचोळकर, शेख हसन यांनी
केली.