जावयाला पेट्रोल टाकून पेटविले

By Admin | Updated: September 14, 2014 01:34 IST2014-09-14T01:34:17+5:302014-09-14T01:34:17+5:30

पातूर तालुक्यातील बल्लारी गावातील घटना.

The petrol poured down the stove | जावयाला पेट्रोल टाकून पेटविले

जावयाला पेट्रोल टाकून पेटविले

पातूर : तालुक्यातील बल्लारी गावातच माहेर असलेल्या पत्नीस घरी परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाच्या अंगावर पत्नीसह सासरच्या लोकांनी पेट्रोल टाकून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ११ सप्टेंबरला घडली. या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चान्नी पोलिस स्टेशनांतर्गत बल्लारी गावात राहणारा गजानन बाबन शिंदे (३५) याची पत्नी शशिकला हिचे माहेर गावातच आहे. ती गावातील माहेरी गेली होती. तिला आपल्या घरी आणण्यासाठी गजानन हा ११ सप्टेंबरला पत्नीच्या माहेरी गेला होता. यावेळी त्याचा सासरच्या मंडळीसोबत वाद झाला. यावेळी त्याची पत्नी शशिकला, सासरा प्रल्हाद बाबर, सासू सुशीला प्रल्हाद बाबर, सुनील बाबर, हरिलाल बाबर, लाला बाबर या सहा जणांनी गजानन शिंदे याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात गजानन ४0 टक्के जळाला. त्याच्यावर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: The petrol poured down the stove