शिकवणी वर्ग परिसरात कायमस्वरूपी पोलिस गस्त

By Admin | Updated: July 15, 2014 00:49 IST2014-07-15T00:49:56+5:302014-07-15T00:49:56+5:30

परिसरात फिरणार्‍या गुंडांचा बंदोबस्त होणार

Permanently police patrol in the tughar square area | शिकवणी वर्ग परिसरात कायमस्वरूपी पोलिस गस्त

शिकवणी वर्ग परिसरात कायमस्वरूपी पोलिस गस्त

अकोला: तोष्णीवाल लेआऊटमधील शिकवणी वर्ग परिसरातील वाढती गुंडगिरी, लुटमारीचे प्रकार रोखण्यासाठी परिसरामध्ये कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी गस्तीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. सोबतच परिसरात फिरणार्‍या टवाळखोर युवकांविरुद्ध कडक करण्यात येईल. असे आश्‍वासन सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी शुक्रवारी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी शिकवणी वर्ग संचालक व नागरिकांच्या बैठकीत दिले. तोष्णीवाल लेआऊटमधील शिकवणी वर्गांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी गुंडांकडून त्रास होत आहे. विद्यार्थ्यांचे मोबाईल पळविणे, मारहाण करून त्यांच्याजवळील रोख लुटून नेण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. या गुंडांकडून विद्यार्थ्यांना मारहाणी करण्यात येते. या मारहाणीत विद्यार्थी जबर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित केल्यावर नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेवून शुक्रवारी सायंकाळी परिसरातील शिकवणी वर्ग संचालक व नागरिकांची बैठक बोलाविले. या बैठकीमध्ये शिकवणी वर्ग संचालकांनी विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवून येथील गुंडगिरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ठाणेदार प्रकाश सावकार यांच्याकडे केली. ठाणेदार सावकार यांनीही परिसरात कायमस्वरूपी गस्त घालण्यात येईल. विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेटच्या मोटारसायकली आणणार्‍या, छेडखानी करणार्‍या टवाळखोर युवकांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे सांगितले. यासोबतच शिकवणी वर्ग संचालकांनी, विद्यार्थ्यांना गणवेश, ओळखपत्र, मोटारसायकलवर क्लासचे स्टिकर बंधनकारक करावे आणि मोटारसायकलचा परवाना नसणार्‍या, गैरवतरुणूक करणार्‍या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेश देऊ नये, अशी सूचना केली. सभेला गणेश पोटे, सुभाष तोष्णीवाल, गोविंद खांबलकर, प्रा. मुकूंद पाध्ये, प्रा. अजरांबर गावंडे, प्रा. शिवशंकर खोटरे, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. दीप, प्रा. सपकाळ, प्रा. वसीम चौधरी, प्रा. नळकांडे, प्रा. ललित काळपांडे, प्रा. पागृत, प्रा. अग्रवाल, प्रा. सुर्वे, प्रा. विवेक शास्त्रकार यांच्यासह के.टी. पद्मने, पंजाबराव देशमुख, योगेश मानकर, बंडू थोरात, राजू देशमुख, श्रीराम वरठी, यशवंत उमाळे, प्रकाश रांदड, बाळूभाऊ पवित्रकार, शरद थोरात, खिराळे, प्रा. काळे, गोलू थोरात, उज्ज्वल बेहरे, प्रवीण, अरविंद मोरे, योगेश खिराळे आदी उपस्थित होते.

Web Title: Permanently police patrol in the tughar square area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.