पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST2021-09-10T04:25:33+5:302021-09-10T04:25:33+5:30

अकोला : वाहन चालविण्याच्या शिकाऊ अनुज्ञप्तीनंतर पक्क्या अनुज्ञप्तीसाठी चाचणी देण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सप्टेंबर २०२१ अखेर शनिवार ...

For a permanent license test | पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी

पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी

अकोला : वाहन चालविण्याच्या शिकाऊ अनुज्ञप्तीनंतर पक्क्या अनुज्ञप्तीसाठी चाचणी देण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सप्टेंबर २०२१ अखेर शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय सुरू राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कोरोना पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे शिकाऊ लायसन्सला देण्यात आलेली मुदतवाढ तसेच फेसलेस लायसन्सची करण्यात आलेली सुविधा यामुळे पक्क्या लायसन्सची चाचणी देणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने विशेषत: पक्क्या अनुज्ञप्तीसाठी वेळ मिळण्यास अडचणी येत आहेत. तेव्हा सर्व शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांनी शिकाऊ अनुज्ञप्तीची मर्यादा संपुष्टात येण्या अगोदर त्यांची पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी होणे अनिवार्य असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने माहे सप्टेंबर २०२१ अखेरपर्यंत पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीकरिता सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार व रविवार या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांनी वाहन परवाना चाचणीकरिता सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू असल्याने पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: For a permanent license test