अकोला जिल्हय़ात मतदानाचा टक्का घसरला
By Admin | Updated: October 17, 2014 01:25 IST2014-10-17T01:25:23+5:302014-10-17T01:25:23+5:30
लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या मतदानात २.२८ टक्क्यांची घट.

अकोला जिल्हय़ात मतदानाचा टक्का घसरला
संतोष येलकर/ अकोला
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या मतदानात जिल्हय़ातील सरासरी मतदानात २.२८ टक्क्यांची घट झाली असल्याने, सहा महिन्यातच जिल्हय़ातील मतदानाचा टक्का वाढण्याऐवजी घसरला आहे.
पाच वर्षांपूर्वी सन २00९ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात एकूण १२ लाख ७६ हजार ९१ मतदार होते. त्यापैकी ५४.११ टक्के मतदान त्यावेळी झाले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल २0१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ात सरासरी ५८.४६ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात होती. प्रत्यक्षात मात्र विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात सरासरी ५६.१८ टक्के मतदान झाले. त्यामुळे सन २00९ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदनाच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील सरासरी मतदानाची टक्केवारी २.0७ टक्के वाढली असली तरी, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या म तदानाच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील सरासरी मतदानाच्या टक्केवारीत २.२८ टक्के घट झाल्याचे चित्र आहे.
संभ्रम व अनुत्साह टक्का घसरण्याचे कारण!
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी दुभंगली. त्यामुळे या निवडणुकीत युती आणि आघाडीचे उमेदवार परस्परांविरोधात निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे एकत्र असलेल्या मतदारांमध्ये विभाजन होऊन, मत कोणाला द्यावे, अशा संभ्रमात मतदार सापडला. निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांसोब त चांगले संबंध असलेल्या कार्यकर्ते, मतदारांची घालमेल झाली. परिणामी संभ्रमात सा पडलेल्या मतदारांनी मतदान करण्याचे टाळले.
जिल्हय़ात मतदारसंघनिहाय असे झाले मतदान!
मतदारसंघ एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारी
आकोट २७१९१८ १६५0८४ ६0.७१
बाळापूर २८00८५ १६७९५0 ५९.९६
अकोला पश्चिम २७६४३२ १४२५६८ ५१.५७
अकोला पूर्व ३00६५१ १६७७0६ ५५.७८
मूर्तिजापूर २९३९४३ १५६0८५ ५३.१0
...............................................
एकूण १४२३0२९ ७९९३९३ ५६.१८