पीरिपाचा २७ जागांवर दावा!
By Admin | Updated: September 7, 2014 01:50 IST2014-09-07T01:50:05+5:302014-09-07T01:50:05+5:30
काँग्रेसकडे केली मागणी; जोगेंद्र कवाडे यांनी अकोला येथे प्रतकारपरिषदेत माहिती दिली.

पीरिपाचा २७ जागांवर दावा!
अकोला: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा)ची कॉंग्रेससोबत युती कायम राहणार असून, पक्षाने काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे विधानसभेच्या २७ जागांची मागणी केली आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पीरिपा यांच्या आघाडीला प त्कराव्या लागलेल्या दारूण पराभवामागे मोदी लाटेशिवाय इतरही कारणे असल्याचे सांगून, प्रा. कवाडे म्हणाले, की त्यांचा पक्ष लढवू इच्छितो, अशा २७ विधानसभा मतदारसंघांची यादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्यास, आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनेही पीरिपासाठी दोन- तीन जागा सोडाव्या, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, राज्यात आघाडीची सत्ता आल्यास, पीरिपाला सत्तेत किमान पाच टक्के वाटा मिळावा अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आघाडी सरकारने केला; मात्र विदर्भातील भूमिहीन शेतमजुरांचा प्रश्न कायम असून, त्यांना अतिक्रमीत जमिनीचे पट्टे अद्यापही मिळालेले नाहीत. राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले असून, दलितांवरील अ त्याचाराच्या घटनांमध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असे आरोपही प्रा. कवाडे यांनी यावेळी केले. दलितांवरील अत्याचाराची प्रकरणे तातडीने निकाली निघाली पाहीजेत, तसेच दलितांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये संबंधित अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहीजे. अत्याचाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी राज्यात सहा जलद गती न्यायालयांची तातडीने स्थापना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागल्याने, शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहीजे, असेही प्रा. कवाडे म्हणाले.
** मोदींचा प्रभाव जाणवणार नाही!
केंद्रातील मोदी सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाले; मात्र मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ह्यअच्छे दिनह्ण केव्हा येणार, हा प्रश्न कायम असल्याने राज्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव जाणवणार नाही, असा दावा प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी केला. मोदी सरकारचा एककल्ली कारभार सुरु असून, ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
** आघाडीची चर्चा होऊ द्या; आमची फरफट नको!
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे; मात्र आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा होऊ द्या; पण घटक पक्ष म्हणून पीरिपाला किती जागा देणार, याबाबत काँग्रेसकडून निर्णय झाला पाहीजे, त्यासाठी आमची फरफट होऊ नये, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळविल्याचेही प्रा. कवाडे यांनी सांगितले. काँग्रेसकडे २७ जागांची मागणी करण्यात आली असून, किमान ११ जागा पीरिपासाठी निश्चितच सोडल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.