अस्वच्छता पसरविणार्या व्यावसायिकांना दंड
By Admin | Updated: October 3, 2014 01:58 IST2014-10-03T01:58:32+5:302014-10-03T01:58:32+5:30
अकोला मनपाची कारवाई.

अस्वच्छता पसरविणार्या व्यावसायिकांना दंड
अकोला : प्लास्टिक पिशवीच्या वापरावर बंदी असतानासुद्धा ती वापरणार्या व परिसरात अस्वच्छता पसरविणार्या व्यावसायिकांना मनपाने ३२ हजारांचा दंड बजावला. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. कोठडी बाजारातील भारती ट्रेडर्स तसेच जनता भाजी बाजारातील जनता सुपर शॉपी, चिराणीया किराणा मनपा कार्यालयानजिकचे राजेंद्र स्टोअर्स आदी व्यावसायिकांना कमी जाडीच्या प्लास्टिक पशव्यांची विक्री करणे, परिसरात अस्वच्छता पसरविण्याच्या सबबीखाली मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने दंड आकारला.