बालरोग तज्ज्ञ कोठारी यांच्या मुलाची आत्महत्या

By Admin | Updated: August 17, 2016 02:24 IST2016-08-17T02:24:38+5:302016-08-17T02:24:38+5:30

एमबीबीएसचे शिक्षण अर्धवट; रेल्वेखाली घेतली उडी.

Pediatrician Kothari's son commits suicide | बालरोग तज्ज्ञ कोठारी यांच्या मुलाची आत्महत्या

बालरोग तज्ज्ञ कोठारी यांच्या मुलाची आत्महत्या

अकोला, दि. १६ : शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अनूप कोठारी यांच्या निकुंज नामक मुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, निकुंजच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
विद्या नगरातील रहिवासी डॉ. अनूप कोठारी यांचा मुलगा निकुंज (२२) हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता; मात्र मध्यंतरीच्या काळात त्याने हे शिक्षण सोडल्याची माहिती आहे. एमबीबीएसचे शिक्षण सोडल्यानंतर काही दिवस त्याची मानसिक स्थितीही खालावल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी रात्री अचानक त्याने बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याने शहरातील डॉक्टर वतरुळात एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ अनूप कोठारी हे मनमिळाऊ स्वभावाचे असून, प्रत्येकासाठी धावून येणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे; मात्र मंगळवारी रात्री त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Pediatrician Kothari's son commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.