शेतक-याने बनविले हळद पॉलिश यंत्र !

By Admin | Updated: December 14, 2014 23:54 IST2014-12-14T23:54:51+5:302014-12-14T23:54:51+5:30

अनुभव हाच गुरु, बाजारभावाची गरज ओळखली !

Peanut-made turmeric machine! | शेतक-याने बनविले हळद पॉलिश यंत्र !

शेतक-याने बनविले हळद पॉलिश यंत्र !

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा
तालुक्यातील मासरूळ येथील शेतकरी जगन्नाथ बाबूराव उंबरकर यांनी हळदीचे पीक घेताना आलेल्या विविध अनुभवातून हळद पॉलिश करण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचा त्यांच्यासह परिसरातील हळदीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना फायदा होत आहे.
बुलडाणा तालुक्यातील मासरूळ परिसरात अनेक वर्षापासून मसाला पिकाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यात हळदीचा प्रामुख्याने सामावेश आहे. येथील बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले जगन्नाथ बाबूराव उंबरकर हे सुध्दा हळदीचे पीक घेतात. पीक काढत असताना त्यांना असंख्य अनुभव आले. त्यातूनच त्यांनी हळदीला पॉलिश करण्याचे यंत्र विकसीत केले आहे. पॉलिश केल्याशिवाय हळद आकर्षक दिसत नाही. यामुळेच हळदीला बाजारभावसुध्दा चांगला मिळत नाही. बाजारभावाची गरज ओळखून जगन्नाथ उंबरकर यांनी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी लोखंडी १६ एम.एम.जाडीचा पत्रा गोल करून त्यापासून बॅरल तयार केले. या बॅरलची साईज सहा फुट आहे. त्यातील रॉडची लांबी सात फुट आहे. हे बॅरल ठेवण्यासाठी एक स्टँड तयार केले. हळद भरण्यासाठी बॅरलला १.५ बाय १.५ फुट आकाराचे तोंड ठेवले. बॅरलमधून एक लोखंडी दांडा बसवून त्याच्या पिंपाच्या बाहेर दोन्ही बाजूला व्हील बसवून ते इलेक्ट्रीक मोटारीच्या साहाय्याने गोलाकार फिरवता येते. बॅरलच्या लोखंडी रॉडवर घर्षणासाठी अणकुचीदार त्रिकोणी आकाराचे पाते बसविले आहे. या बॅरलवर ९ ते १0 इंच आकाराचे छिद्र पाडल्याने पॉलिश करताना हळदीचे अवशेष त्यातून बाहेर पडतात. अशा प्रकारच्या बॅरलमध्ये पॉलिश करण्यासाठी २ ते १३ दिवस वाळलेली हळद टाकून त्यामध्ये घर्षणासाठी वापरता येते. १५ मिनीटात एक क्विंटल हळद पॉलिश होते. दिवसाला सरासरी २0 ते २५ क्विंटल क्षमतेपर्यंत हळद पॉलिश करता येऊ शकते. या यंत्राचा उपयोग जगन्नाथ उंबरकर स्वत:सह परिसरातील शेतकर्‍यांसाठी करीत आहेत.

Web Title: Peanut-made turmeric machine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.