पातूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST2021-04-14T04:17:35+5:302021-04-14T04:17:35+5:30
बैठकीत ठाणेदार हरीश गवळी यांनी मार्गदर्शन केले. मिरवणुकीचे नियोजन व परवानगीचे आदेश शासनाकडून नसल्याने आगामी सण, उत्सव साधेपणाने शासनाच्या ...

पातूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक
बैठकीत ठाणेदार हरीश गवळी यांनी मार्गदर्शन केले. मिरवणुकीचे नियोजन व परवानगीचे आदेश शासनाकडून नसल्याने आगामी सण, उत्सव साधेपणाने शासनाच्या नियमानुसार कुठलीही गर्दी न करता साजरे करावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, महामानवांच्या विचारांची पुस्तके विद्यार्थ्यांना देऊन उत्सव साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन ठाणेदार हरीश गवळी यांनी केले. यावेळी विधिज्ञ ॲड. अमजद अली काझी, नगर परिषद सदस्य हिदायत खान रूम खान, निर्भय पोहरे, बळीराम खंडारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस कर्मचारी भवाने, पोलीस पाटील निरंजन कढोणे, राजेश देशमुख, वनिता बोचरे, प्रकाश निमकंडे, साहेबराव सुरवाडे, सागर कढोणे, बळीराम खंडारे आदींसह पत्रकार, पोलीस पाटील उपस्थित होते. (फोटो)