कुरूम येथे शांतता समिती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:15 IST2021-01-09T04:15:03+5:302021-01-09T04:15:03+5:30

कुरूम : मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरूम येथे १५ जानेवारीला होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात शांतता समितीची ...

Peace Committee meeting at Kurum | कुरूम येथे शांतता समिती सभा

कुरूम येथे शांतता समिती सभा

कुरूम : मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरूम येथे १५ जानेवारीला होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात शांतता समितीची सभा माना पो. स्टे.चे ठाणेदार संजय खंडारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व तंटामुक्ती अध्यक्ष श्रावण दावेदार यांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारीला पार पडली.

यावेळी ठाणेदार संजय खंडारे यांनी मार्गदर्शनात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व आचारसंहितेचा भंग होणार याची दक्षता घ्यावी. निवडणूक शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग नागरिकांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येण्या-जाण्यासाठी वाहन परवाना काढावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी पो.पा. वसंत विरुळकर, माजी पं.स. उपसभापती उमेश मडघे, चंद्रकांत अडसोड, ऐनुलभाई, हाजी नासिरभाई, राहुल राठी, से. सह. सोसायटी अध्यक्ष अ. जहिर अ. अजीज, विजय जयस्वाल, संतोष कांडलकर, जयप्रकाश कांडलकर, राजेंद्र बैतुले, गोवर्धन सिरसाट, अनिल सुसतकर, श्रीराम सावळे आदी उपस्थित होते.

Web Title: Peace Committee meeting at Kurum