शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या मीटर तपासणी व इतर देयकांचा भरणाही आता आॅनलाईन!

By atul.jaiswal | Updated: July 16, 2019 18:06 IST

वीजबिल व नवीन जोडणीच्या शुल्कासह महावितरणने आता आपल्या इतर देयकांचाही आॅनलाईन भरणा करण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

अकोला : वीज सेवाविषयक बहुतांश देयके भरण्यासाठी आता ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. वीजबिल व नवीन जोडणीच्या शुल्कासह महावितरणने आता आपल्या इतर देयकांचाही आॅनलाईन भरणा करण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.मानवी हस्तक्षेप टाळून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा आॅनलाईन देण्याच्या उद्देशाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण माहिती तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवित आहे. त्याअंतर्गत नवीन वीजजोडणीचे शुल्क आणि वीजबिलाचा भरणा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. आता नवीन मीटरचे शुल्क (नादुरुस्त मीटरची किंमत ग्राहकाकडून वसूल करावयाची असल्यास), मीटर तपासणी शुल्क, सीटी/पीटी तपासणी शुल्क, मीटर इतरत्र बसविण्यासाठीचे शुल्क आॅनलाईन भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.महावितरणच्या संकेतस्थळावर 'आॅनलाइन प्रणालीद्वारे इतर देयकांचा भरणा' या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेमुळे संबंधित देयक भरण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. तसेच देयकाचा भरणा आॅनलाईन झाल्याने निश्चित कालमयार्देत काम पूर्ण करणे सुलभ होईल. या उपलब्ध सुविधेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाonlineऑनलाइन