शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन पूर्वीप्रमाणेच अदा करा!

By Admin | Updated: October 23, 2014 02:23 IST2014-10-23T02:03:56+5:302014-10-23T02:23:55+5:30

अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाची मागणी

Pay teachers, teaching staff without paying as before! | शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन पूर्वीप्रमाणेच अदा करा!

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन पूर्वीप्रमाणेच अदा करा!

अकोला: अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे समायोजन व वेतनाबाबत शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकास स्थगिती देऊन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते पूर्वीप्रमाणेच अदा करण्यात यावे, अशी मागणी अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते ह्यशालार्थह्ण प्रणालीद्वारे अदा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, १४ ऑक्टोबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन ह्यशालार्थह्य प्रणालीतून अदा न करता ऑफ लाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत शासनाच्या १४ ऑक्टोबर २0१४ च्या परिपत्रकास स्थगिती देण्यात यावी व न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते पूर्वीप्रमाणेच मूळ आस्थापनेमधून अदा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय कौसल, अँड.विलास वखरे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, बळीराम झामरे, अविनाश बोर्डे, जयदीप सोनखासकर, गजानन मानकर, किशोर देशमुख, तेजराव काळमेघ, विलास अत्रे व इतर पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Pay teachers, teaching staff without paying as before!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.