शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पवार नव्हे, आंबेडकरच खोटे - राष्ट्रवादी नेत्यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:51 IST

पवार खोटे बोलत आहेत, अशी टीका करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हेच महाखोटे असल्याचा पलटवार माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

अकोला : मी शरद पवारांच्या नव्हे, काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलो होतो. पवार खोटे बोलत आहेत, अशी टीका करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हेच महाखोटे असल्याचा पलटवार माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका कृतघ्नपणाचा कळस असल्याचे सांगत, सन १९८४, १९८९, १९९१ व १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदार संघातून सातत्याने अ‍ॅड.आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर १९९८ मध्ये शरद पवार यांनी राज्यात दलित ऐक्य घडवून आणले आणि ‘आरपीआय’वेगवेगळ्या गटाच्या चारही नेत्यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणले. त्यावेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दरबारात शरद पवारांच्या शब्दाला मोठे वजन होते, ही बाब राज्यातील सर्वांनाच माहीत आहे, असे गुलाबराव गावंडे यांनी सांगितले. राज्यात शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राम पंडागळे, जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये यांच्यासारखे अनेक बौद्ध समाजाचे नेते आमदार झाले, तसेच मुस्लीम व विविध समाजाला विधान परिषदेवर संधी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर केले. शरद पवार जात-पात मानत नसून, मागासवर्गीयांना मोठे करण्याची त्यांची तळमळ राहिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गरिबांचे नेते असलेले शरद पवार यांना जातीयवादी म्हणणे योग्य नाही, असे गुलाबराव गावंडे म्हणाले. मुळात अ‍ॅड.आंबेडकर यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडीच करायची नाही; मात्र आंबेडकरी जनतेचा दबाव असल्याने, शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेचे गुºहाळ सुरू ठेवायचे आणि शेवटी राज्यात भाजपाचा अप्रत्यक्षपणे फायदा करून द्यायचा अशीच त्यांची भूमिका आहे, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला. यावेळी माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, प्रा. विश्वनाथ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभय्या गावंडे, श्रीकांत पिसे पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट, डॉ.आशा मिरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, दिलीप आसरे उपस्थित होते.

अ‍ॅड. आंबेडकर भाजपाची मध्यस्थी करणारे!अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर भाजपाला मदत करणारे मध्यस्थी आहेत. राज्यात भाजपाला मोठे करण्याचे काम ते करीत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव गावंडे यांनी केला.बौद्ध समाजाला आमदार बनवू शकले नाही!अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ज्या समाजाच्या शक्तीवर राजकारण करतात, त्या बौद्ध समाजाला अद्यापही आमदार बनवू शकले नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला. अ‍ॅड. आंबेडकरांची ‘लाइफ लाइन’ केवळ अकोला जिल्हा परिषद असून, ती कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊनच अस्तित्वात असते. जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची स्वबळावर कधीही सत्ता नव्हती, आजही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा केवळ शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळेच मिळतो, असा टोलाही गुलाबराव गावंडे यांनी लगावला.जिल्हा परिषदेत ‘भारिप’ची सत्ता कोणामुळे?धर्मनिरपेक्ष भूमिका ठेवून भाजपासोबत न जाता जिल्हा परिषदेत आम्ही भारिप-बमसंसोबत राहिलो आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची सत्ता कोणामुळे आहे, हे जिल्हावासीयांना माहीत आहे, असे माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी सांगितले. अ‍ॅड. आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी शरद पवार अकोल्यात आले होते, तेव्हा त्यांनी अ‍ॅड. आंबेडकर पराभूत होता कामा नये, असा सल्ला आम्हाला दिला होता, असेही बिडकर यांनी सांगितले.आंबेडकर ओवेसीसोबत कसे?धर्मनिरपेक्ष असलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ओवेसीसोबत कसे बसतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. आशा मिरगे यांनी यावेळी उपस्थित केला. अ‍ॅड. आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका योग्य नसल्याचेही त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर