पातूर तालुका @ ८६.५४%
By Admin | Updated: May 31, 2017 01:16 IST2017-05-31T01:16:46+5:302017-05-31T01:16:46+5:30
पातूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.५४ टक्के लागला आहे. पातूर तालुक्यात एकूण २,४५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले होते. त्यापैकी २,१0३ विद्यार्थी पास झाले आहेत.

पातूर तालुका @ ८६.५४%
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.५४ टक्के लागला आहे. पातूर तालुक्यात एकूण २,४५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले होते. त्यापैकी २,४५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी २,१0३ विद्यार्थी पास झाले आहेत. बाबुजी नाईक आश्रमशाळा गावंडगाव विज्ञान शाखेचा व सुमनताई वानखडे क. महाविद्यालय भंडारजचा कॉमर्सचा निकाल १०० टक्के लागला.
तुळसाबाई कावल विद्यालयाचा निकाल ७९.५४ टक्के , डॉ. एच. एन. सिन्हा आर्टस्चा ७0 टक्के व कॉमर्सचा ७६.५९ टक्के, शाहबाबू उर्दु आर्ट ज्युनि. कॉलेज पातूर निकाल ९१.९३टक्के असून व्ही. देशमुख आर्टस् अॅन्ड कॉमर्स ज्युनि. कॉलेज आलेगावचा निकाल ६८.४९ टक्के निकाल लागला. तसेच एस. एल. शिंदे विद्यालय सस्तीचा निकाल ९0.५४ टक्के, बेबीताई इंगळे विद्यालय विवराचा ८८.६३, जय बजरंग विद्यालय चान्नीचा ७८.७0, प्रियदर्शनी इंदिरा गांधी विद्यालय पातूर ८९.२८, सिद्धार्थ विहार पास्टुल ८0.६८, स्वातंत्र्य सैनिक बाबूजी तायडे विद्यालय आगिखेडचा निकाल ८0.८५, वसंतराव नाईक विद्यालयाचा ९७.४६, सुधाकरराव नाईक विद्यालय शेकापूर फाटा ९८.५५ असा निकाल लागला. महात्मा फुले कॉलेज चोंढी ८२.२२, सरलाबाई गहिलोत विद्यालय बाभुळगाव ९२.१0, सुमनताई वानखडे कॉलेज भंडारज ९0.0९, बाजूजी नाईक विद्यालय आश्रमशाळा गावंडगाव ९७.७२, सावित्रीबाई फुले विद्यालय पातूरचा ८९.७४, मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यालय खेट्री ६0, हाजी सै. अकबर उर्दू कॉलेज पातूरचा ६६.६६ टक्के निकाल लागला. गुरुगणेश मिश्रा कॉलेज आलेगाव ९२.३0, शाहबाबू उर्दू कॉलेज आलेगाव ६४.७0 , डॉ. एच. एन. सिन्रा आर्टस् अॅन्ड कॉमर्स कॉलेज पातूरचा व्होकेशनलचा एकूण निकाल ८0.४८ टक्के आहे. तसेच तुळसाबाई कावल ज्युनि. कॉलेज पातूर व्होकेशनलचा एकूण निकाल ७७.९६ टक्के आहे. तसेच देशमुख विद्यालय आलेगाव व्होकेशनला एकूण निकाल ९५.२३ आहे.