पातूर नगराध्यक्षांची नगरसेवकाला मारहाण!

By Admin | Updated: January 30, 2016 02:23 IST2016-01-30T02:23:35+5:302016-01-30T02:23:35+5:30

नगराध्यक्षांचा मारहाण न केल्याचा दावा.

Patur municipal corporator killed! | पातूर नगराध्यक्षांची नगरसेवकाला मारहाण!

पातूर नगराध्यक्षांची नगरसेवकाला मारहाण!

पातूर: नगरपालिकामध्ये सभागृहात नगराध्यक्षांनी स्वीकृत नगरसेवकाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. मात्र, नगराध्यक्षांनी अशी घटनाच घडली नसल्याचा दावा केला आहे. नगरसेवक दुपारी १ वाजता सभागृहामध्ये बसून शहरामध्ये होत असलेल्या कामांबाबत चर्चा करीत होते. तेवढय़ात नगराध्यक्ष हिदायत खान हे सभागृहात आले. नगरसेवकांची एकमेकांसोबत चर्चा सुरू असल्याचे पाहून नगराध्यक्ष हिदायत खान यांनी सभागृहात चर्चा करू नका आणि येथून बाहेर जा, असे म्हटले. त्यांनी स्वीकृत नगरसेवक असलेल्या शे. उस्मान शेख भोलू यांना मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Patur municipal corporator killed!