रुग्णांनी ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST2021-04-02T04:18:43+5:302021-04-02T04:18:43+5:30

अकोला : ज्या कोविड रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्याची सुविधा आहे, अशा रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ...

Patients should monitor oxygen levels | रुग्णांनी ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवावे

रुग्णांनी ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवावे

अकोला : ज्या कोविड रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्याची सुविधा आहे, अशा रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अशा रुग्णांनी स्वतःच्या ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे. सकाळी सहा मिनिटे खोलीतच चालावे. ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी आल्यास तत्काळ रुग्णालयात भरती व्हावे, असा वैद्यकीय सल्ला डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.

गृह अलगीकरणातील रुग्णांना औषधोपचार घ्यावयाचा असतो. तसेच पूर्ण विश्रांती घ्यावयाची असते. या रुग्णांनी उपचारकाळात घरातील एका खोलीत राहावयाचे असते. घरातील अन्य व्यक्तींशी कुठेही संपर्क होणार नाही याची काळजी स्वतः रुग्णाने व घरातील अन्य व्यक्तींनीही घेणे आवश्यक आहे. आपल्या घरातील व्यक्तीला कोविड संसर्ग झाला आहे, ही बाब शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून लपवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे

बाॅक्स

ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा खाली नकाे

प्रत्येक रुग्णाने रोज सकाळी, दुपारी व सायंकाळी अशी तीन वेळा स्वतःची ऑक्सिजन पातळी पल्स ऑक्सिमीटरने मोजावी. सकाळी खोलीतल्या खोलीत सहा मिनिटे चालावे. नंतर पातळी मोजावी. ती ९४ पेक्षा कमी आल्यास तत्काळ रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Patients should monitor oxygen levels