रुग्णाच्या नातेवाइकांची महिला डॉक्टरला धक्काबुक्की
By Admin | Updated: December 2, 2015 02:58 IST2015-12-02T02:58:53+5:302015-12-02T02:58:53+5:30
महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर किरकोळ जखमी.

रुग्णाच्या नातेवाइकांची महिला डॉक्टरला धक्काबुक्की
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात जखमी अवस्थेत आणलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा घडला.
सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारी रात्री १0.३0 च्या सुमारास राजेश सावंग नामक एका इसमाला जखमी अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात दाखल केले. महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर जखमीवर उपचार करीत असताना मद्यपी रुग्ण व त्याच्या नातेवाइकांनी महिला डॉक्टरला शिवीगाळ केली. दरम्यान, रुग्णाने महिला डॉक्टरला लाथ मारल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ड्युटी इंचार्ज डॉ. अमोल रावणकर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी येथून पळ काढला. या घटनेत महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर किरकोळ जखमी झाली असून, डॉ. रावणकर यांनी सदर प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली.