पातूर नगर परिषदेचे कामकाज बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST2021-09-02T04:41:26+5:302021-09-02T04:41:26+5:30

ठाणे येथील घटनेचा निषेध पातूर: ठाणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्यावर असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला ...

Pathur Municipal Council closed! | पातूर नगर परिषदेचे कामकाज बंद!

पातूर नगर परिषदेचे कामकाज बंद!

ठाणे येथील घटनेचा निषेध

पातूर: ठाणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्यावर असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ३० ऑगस्ट रोजी घडली. या भ्याड हल्ल्याप्रकरणी पातूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत कामकाज बंद ठेवले.

ठाणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे खच्चीकरण होते, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. या हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी पातूर न.प. कर्मचाऱ्यांनी केली. या वेळी निषेध व्यक्त करीत कर्मचाऱ्यांनी कामकाज कडकडीत बंद ठेवले होते. (फोटो)

310821\img-20210831-wa0230.jpg

पातूर नगरपरिषद कामकाज कडकडीत बंद

Web Title: Pathur Municipal Council closed!