पार्कमध्ये अश्लील चाळे करणारे इंजिनिअर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:19 PM2018-08-08T12:19:14+5:302018-08-08T12:20:41+5:30

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्कमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे प्रेमी युगुल अश्लील चाळे करीत असताना त्यांना दामिनी पथकाने मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले.

In the park, lover caught by police | पार्कमध्ये अश्लील चाळे करणारे इंजिनिअर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यत

पार्कमध्ये अश्लील चाळे करणारे इंजिनिअर प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यत

Next
ठळक मुद्देचंद्रपूर येथील रहिवासी असलेली युवती पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर युवक बाभूळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने आई-वडिलांच्या चोरून ते कधी पुणे, तर कधी अकोल्यात भेटायचे.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्कमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे प्रेमी युगुल अश्लील चाळे करीत असताना त्यांना दामिनी पथकाने मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.
चंद्रपूर येथील रहिवासी असलेली युवती पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर युवक बाभूळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने आई-वडिलांच्या चोरून ते कधी पुणे, तर कधी अकोल्यात भेटायचे. पुण्यात असलेली युवती सोमवारी अकोल्यात प्रियकराला भेटण्यासाठी आली. दोघेही नेहरू पार्कमध्ये बसले. कुणीही नसल्याची संधी साधत अश्लील चाळे करीत असताना दामिनी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. प्रेमी युगुलास खदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले. युवक-युवतींकडून त्यांच्या आई-वडिलांचे मोबाइल नंबर घेतले व त्यांना घडलेला प्रकार सांगण्यात आला. दोघांचेही आई-वडील अकोल्यात आल्यानंतर युवक व युवतीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

 

Web Title: In the park, lover caught by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.