शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

पारस औष्णिक केंद्राचा २६७ दिवस अखंडित वीज उत्पादनाचा नवा विक्रम, सलग २६७ दिवस वीज उत्पादन

By atul.jaiswal | Published: April 09, 2024 1:37 PM

Akola News: महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रातील (Paras Thermal Power) २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग २६७ दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात या संचाने नवीन ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

- अतुल जयस्वाल अकोला - महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग २६७ दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात या संचाने नवीन ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. २१० मेगावाट चंद्रपूर संच क्रमांक-३ च्या नावे या अगोदर अखंडित वीज उत्पादनाची २००९ मध्ये २६६ दिवसांच्या विक्रमाची नोंद होती. तो विक्रम मोडून पारस वीज केंद्राने आपले नाव कोरले आहे.

पारस संच क्रमांक ४ ने या २६७ दिवसांत १३८५.१ मिलियन युनिट्स आणि सरासरी २१६ मेगावॅटसह वीज उत्पादन केले आहे. पारस वीज केंद्राने नोव्हेंबर-२०२३ (९०.२२%), जानेवारी-२०२४ (९१.०२%) आणि फेब्रुवारी-२०२४ (९५.५५%) मध्ये मासिक महाराष्ट्र वीज नियामक आयोग उपलब्धता घटक वर ''''शून्य नामंजूर'''' लक्ष्य यशस्विरीत्या साध्य केले आहे, हे विशेष. पारस वीज केंद्राने २०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी-२०२४ (९३.९७%) मध्ये सर्वाधिक मासिक केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारांक गाठले आहे. 

पारस वीज केंद्राने ऑगस्ट-२०२३ पासून मासिक विशिष्ट इंधन वापर वर ‘शून्य अस्वीकृती’ प्राप्त केली आहे. उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता, पारस वीज केंद्र आपला नावलौकिक कायम राखत महत्तम वीज उत्पादनासाठी सज्ज आहे.-शरद भगत, मुख्य अभियंता, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, पारस

टॅग्स :AkolaअकोलाParas Thermal Powerपारस वीज निर्मिती केंद्रelectricityवीज