पारस औष्णिक केंद्राचा २६७ दिवस अखंडित वीज उत्पादनाचा नवा विक्रम, सलग २६७ दिवस वीज उत्पादन
By Atul.jaiswal | Updated: April 9, 2024 13:38 IST2024-04-09T13:37:43+5:302024-04-09T13:38:45+5:30
Akola News: महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रातील (Paras Thermal Power) २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग २६७ दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात या संचाने नवीन ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

पारस औष्णिक केंद्राचा २६७ दिवस अखंडित वीज उत्पादनाचा नवा विक्रम, सलग २६७ दिवस वीज उत्पादन
- अतुल जयस्वाल
अकोला - महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग २६७ दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात या संचाने नवीन ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. २१० मेगावाट चंद्रपूर संच क्रमांक-३ च्या नावे या अगोदर अखंडित वीज उत्पादनाची २००९ मध्ये २६६ दिवसांच्या विक्रमाची नोंद होती. तो विक्रम मोडून पारस वीज केंद्राने आपले नाव कोरले आहे.
पारस संच क्रमांक ४ ने या २६७ दिवसांत १३८५.१ मिलियन युनिट्स आणि सरासरी २१६ मेगावॅटसह वीज उत्पादन केले आहे. पारस वीज केंद्राने नोव्हेंबर-२०२३ (९०.२२%), जानेवारी-२०२४ (९१.०२%) आणि फेब्रुवारी-२०२४ (९५.५५%) मध्ये मासिक महाराष्ट्र वीज नियामक आयोग उपलब्धता घटक वर ''''शून्य नामंजूर'''' लक्ष्य यशस्विरीत्या साध्य केले आहे, हे विशेष. पारस वीज केंद्राने २०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी-२०२४ (९३.९७%) मध्ये सर्वाधिक मासिक केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारांक गाठले आहे.
पारस वीज केंद्राने ऑगस्ट-२०२३ पासून मासिक विशिष्ट इंधन वापर वर ‘शून्य अस्वीकृती’ प्राप्त केली आहे. उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता, पारस वीज केंद्र आपला नावलौकिक कायम राखत महत्तम वीज उत्पादनासाठी सज्ज आहे.
-शरद भगत, मुख्य अभियंता, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, पारस