कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीयरिंगच्या अध्यक्षपदी पंकज काेठारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST2021-07-04T04:14:03+5:302021-07-04T04:14:03+5:30

अकोला शाखेची ऑनलाइन वार्षिक आमसभा मावळते अध्यक्ष अजय लोहिया यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी सभेत सन २०२१-२३ या कालावधीसाठी ...

Pankaj Kaethari as the President of Consulting Civil Engineering | कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीयरिंगच्या अध्यक्षपदी पंकज काेठारी

कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीयरिंगच्या अध्यक्षपदी पंकज काेठारी

अकोला शाखेची ऑनलाइन वार्षिक आमसभा मावळते अध्यक्ष अजय लोहिया यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी सभेत सन २०२१-२३ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी पंकज कोठारी, सचिव इस्माईल नाजमी, कोषाध्यक्ष चंद्रशेखर मुखेडकर, कार्यकारी सदस्य अनुराग अग्रवाल, कपिल ठक्कर, रिजवान कुरेशी आदींची निवड करण्यात आली. साेपविण्यात आलेली जबाबदारी आपण याेग्यरीत्या पार पाडून पश्चिम विदर्भात स्थापत्य, निर्माण अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कोठारी यांनी दिली. तसेच उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश रायपुरे व निर्वाचित राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप शिरखेडकर नागपूर यांनी सभेला मार्गदर्शन केले. यावेळी असो.चे मावळते सचिव अभिजीत परांजपे, कोषाध्यक्ष श्याम साधवानी, कार्यकारी सदस्य संजय भगत आदी उपस्थित होते.

Web Title: Pankaj Kaethari as the President of Consulting Civil Engineering