मतदारसंघनिहाय इच्छुकांचे पॅनल!
By Admin | Updated: September 1, 2014 21:50 IST2014-09-01T21:50:27+5:302014-09-01T21:50:27+5:30
पक्षाने जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदारसंघनिहाय इच्छुकांचे पॅनल तयार केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मतदारसंघनिहाय इच्छुकांचे पॅनल!
अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसमधील इच्छुकांच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली असून, उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षाने जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदारसंघनिहाय इच्छुकांचे पॅनल तयार केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या पॅनलमधील एका इच्छुकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. अकोला पूर्व, बाळापूर व आकोटमध्ये प्रत्येकी तीन आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील पॅनलमध्ये चार इच्छुकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील विधानसभेच्या अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर पाच मतदारसंघांसाठी कॉँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. अकोला जिल्हा कॉँग्रेस कमिटीकडून हे अर्ज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पाठविण्यात आले होते.
१७ ऑगस्ट रोजी अकोला पूर्व व पश्चिम, आकोट आणि बाळापूर या चार विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या सामूहिक मुलाखती कॉँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात घेण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या नाहीत.