पंचायत समिती सदस्यांची कार्यशाळा सुरू
By Admin | Updated: January 2, 2015 01:32 IST2015-01-02T01:32:41+5:302015-01-02T01:32:41+5:30
अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सदस्यांचा सहभाग.

पंचायत समिती सदस्यांची कार्यशाळा सुरू
अकोला : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांची तीन दिवसीय कार्यशाळा सोमवारपासून अकोल्यात सुरू झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांचे सदस्य सहभागी झाले आहेत. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्ना चोरे होत्या. तीन दिवसीय कार्यशाळेत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांचे शंभर सदस्य सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामन्य प्रशासन) जावेद इनामदार, अमरावती येथील प्रशिक्षक प्रदीप देशमुख यांनी सदस्यांना विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे अधीक्षक प्रदीप खाडे यांनी केले.
*योजनांच्या माहितीसाठी कार्यशाळेची गरज!
सुदृढ लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींना कायद्यासह सर्व शासकीय योजनांची माहिती असावयास हवी. त्यासाठी अशा कार्यशाळा आयोजित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.