पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला सदस्याने ठोकले कुलूप!

By Admin | Updated: June 8, 2016 02:21 IST2016-06-08T02:21:38+5:302016-06-08T02:21:38+5:30

सर्वसामान्यांची कामे होत नसल्याचा आरोप.

Panchayat committee entrance door locked by the member! | पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला सदस्याने ठोकले कुलूप!

पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला सदस्याने ठोकले कुलूप!

अकोला: पैशाशिवाय सर्वसामान्य लोकांची कोणतीही कामे होत नसल्याचा आरोप करीत, पंचायत समिती सदस्य मंगेश काळे व त्यांच्या सर्मथकांनी मंगळवारी दुपारी अकोला पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले व तेथेच काही काळ ठिय्या दिला.
अकोला पंचायत समितीमध्ये गोरगरिबांची कोणतीही कामे करण्यात येत नाहीत. सिंचन विहीर, घरकुल, शौचालय बांधकामाच्या अनुदानासह इतर कामांसाठी पैसे मागितले जातात. पैसे दिल्याशिवाय सर्वसामान्यांची कोणतीही कामे होत नाहीत, पंचायत समितीमध्ये अधिकारी वर्ग उपस्थित राहत नसल्याने विविध कामांसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असा आरोप करीत, पंचायत समिती सदस्य राजेश काळे यांनी सर्मथकांसह मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास अकोला पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले आणि प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला. सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले व खरपचे सरपंच प्रकाश रेड्डी यांनी मंगेश काळे यांची समजूत काढल्यानंतर अध्र्या तासानानंतर ४ वाजता पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला लावण्यात आलेले कुलूप उघडण्यात आले.

Web Title: Panchayat committee entrance door locked by the member!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.