न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या आराेपीला पाेलिस काेठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST2021-07-26T04:18:38+5:302021-07-26T04:18:38+5:30

सिंधी कॅम्प येथील रहिवासी चार्टर्ड अकाउंटंट विनय थावरानी यांनी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गोपाल हाडोळेने न्यायालयात बनावट ...

Palis Kathadi to the accused who misled the court | न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या आराेपीला पाेलिस काेठडी

न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या आराेपीला पाेलिस काेठडी

सिंधी कॅम्प येथील रहिवासी चार्टर्ड अकाउंटंट विनय थावरानी यांनी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गोपाल हाडोळेने न्यायालयात बनावट करारनामा सादर केला होता. या करारनाम्यावर चार्टर्ड अकाउंटंट विनय थावरानी यांच्या स्वाक्षऱ्या खोट्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यांनतर विनय थावरानी यांनी नागपूर येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडून स्वाक्षरीची तपासणी केली असता गोपाल होडोळेने सादर केलेल्या करारनाम्यातील विनय थावरानी यांची स्वाक्षरी बनावट असल्याचा अहवाल हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिला हाेता. त्याआधारे विनय थावरानी यांनी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी गोपाल हाडोळे त्याची पत्नी प्रतिभा हाडोळे व सचिन मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला हाेता़ रामदास पेठ पोलिसांनी या गुन्ह्यात एक कलमाची वाढ करून शनिवारी आराेपी गाेपाल हाडोळे यास अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीस दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली़

Web Title: Palis Kathadi to the accused who misled the court