६०० पाेती गव्हाची हेराफेरी करणाऱ्यास पाेलीस काेठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST2021-09-21T04:20:52+5:302021-09-21T04:20:52+5:30

खामगाव येथून एपी २० टीबी ४६९९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू भरून, तो तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील काळ्या ...

Paelis wood for the one who swindles 600 paise of wheat | ६०० पाेती गव्हाची हेराफेरी करणाऱ्यास पाेलीस काेठडी

६०० पाेती गव्हाची हेराफेरी करणाऱ्यास पाेलीस काेठडी

खामगाव येथून एपी २० टीबी ४६९९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू भरून, तो तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह बाळापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवून, सापळा रचून स्वस्त धान्य दुकानातील ६०० पाेती गहू व ट्रक असा एकूण २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ट्रकचा चालक शेख जावेद शेख खाजा वय २८ वर्षे राहणार आदिलाबाद खानापूर राज्य तेलंगणा यास अटक करून, न्यायालयासमाेर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली़

मुख्य राशन माफीया माेकाटच

तब्बल ६०० पाेती गहू हा स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे समाेर आले आहे. या गव्हाचा मुख्य मालक राशन माफीया अद्यापही माेकाट असून, पाेलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही. या राशन माफीयाचा पाेलिसांनी शाेध सुरू केल्याची माहिती आहे़ बाळापूर पाेलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, खामगाव व अकाेल्यात माेठा माफीया असलेल्यास अटक केल्यास, आणखी माेठे घबाड बाहेर निघण्याची शक्यता आहे.

Web Title: Paelis wood for the one who swindles 600 paise of wheat