पाेलिसांना गणवेश साहित्याऐवजी मिळणार ५ हजारांचा भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:49+5:302021-07-27T04:19:49+5:30
राज्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख ३७ हजार ४०७ राज्यातील पाेलिसांसाठी भत्ता निधी ७० काेटी ...

पाेलिसांना गणवेश साहित्याऐवजी मिळणार ५ हजारांचा भत्ता
राज्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख ३७ हजार ४०७
राज्यातील पाेलिसांसाठी भत्ता निधी ७० काेटी ९९ लाख ८१ हजार ९६९ रुपये
ऑगस्ट महिन्यात हाेणार जमा
प्रत्येक पाेलीस कर्मचाऱ्याच्या खात्यात गणवेश भत्त्याची सुमारे पाच हजार १६७ रुपयांची रक्कम ऑगस्ट महिन्यात जमा हाेणार असल्याची माहिती आहे. त्यासाठीचे परिपत्रक अर्थ विभागाने काढले असून, ही प्रक्रिया पूर्ण हाेताच रक्कम खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू हाेणार असल्याची माहिती आहे.
पाेलीस बांधवांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता मिळणार आहे. यासाठी नियाेजन करण्यात आले असून, ही प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरून राबविण्यात येणार आहे. अकाेला जिल्ह्यातील सुमारे दाेन हजार ४०० पाेलीस कर्मचाऱ्यांना या भत्त्याचा लाभ हाेणार आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांना हा भत्ता मिळण्याची शक्यता आहे.
जी.श्रीधर, पाेलीस अधीक्षक अकाेला.