शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

अकोला-गुडधी येथे बेवारस कारमध्ये सापडलेल्या गांजाचा मालक अखेर गवसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:04 PM

​​​​​​​अकोला : गुडधीमध्ये बेवारस कारमध्ये सापडलेल्या आठ किलो गांजाचा मालक सिव्हिल लाइन पोलिसांना आठ महिन्यांनंतर गवसला. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

ठळक मुद्देआठ महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघडकीस आरोपीस शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुडधीमध्ये बेवारस कारमध्ये सापडलेल्या आठ किलो गांजाचा मालक सिव्हिल लाइन पोलिसांना आठ महिन्यांनंतर गवसला. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.  सिव्हिल लाइन पोलिसांनी गांजा व कार जप्त करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुडधी परिसरात कारमध्ये गांजा कोणी आणला आणि कार बेवारस सोडून आरोपी कुठे पळाले, याचा तपास पोलीस करीत आहेत. शहरातील गुडधीमध्ये काल रात्रीपासून एमएच 0२ जे ७५६७ क्रमांकाची एक बेवारस कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासणी केल्यावर पोलिसांना कारमध्ये ८ किलो ६८८ ग्रॅम गांजा ठेवलेला दिसून आला. पोलिसांनी गांजा व कार जप्त केली. या गांजाची किंमत ३४ हजार रुपये आहे. ग्रामीण भागामध्ये हा गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या व्यक्तींना संशय आल्यामुळे त्यांनी जागेवरच कार सोडून पळ काढला होता. सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. कारचालकाची माहितीसुद्धा पोलिसांनी काढली; परंतु आरोपी मिळत नव्हता. तब्बल आठ महिन्यांनंतर आरोपी गोकुळ महादेव चांदुरकर (रा. हरिहरपेठ) याला गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. त्याने गांजा त्याचाच असल्याची कबुली दिली. सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात आरोपी गोकुळला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

टॅग्स :Civil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा