शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 18:39 IST

Soybean crop in Murtijapur taluka : सोयाबीनच्या परीपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टर वरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची झळ संपत नाही तोच सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे असल्याने शेकडो हेक्टर वरील सोयाबीनच्या परीपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे.            २३-२४ जुलै व ६-७ सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पाण्याखाली आली होती. २३ - २४ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी काठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्षांक होता जवळपास हा लक्षांक पुर्ण झाला असून ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील २३ - २४ जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमीनत पुराचे पाणी शिरले होते त्यात शेती खरडून गेल्याने  अंतिम अहवालात नुसार ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ६-७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात ४४३ हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता त्या पेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षी ती ४७ हजार १७७ हेक्टर झाली. तुर ११ हजार १५६ पेरणी झाली आहे. परंतू सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तुर, कपाशी या मुख्य पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी जात नाही तोच भरीस भर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमन केले आहे. सोयाबीनला आलेल्या शेंगा त्या परीपक्व अवस्थेत असताना सुकल्या आहेत यामुळे पुन्हा शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असून शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास तोही या अज्ञात रोगाने हिसकावून घेतला आहे. यात हजारो हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्याने सदर पिकाचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेतीFarmerशेतकरी