म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव; आराखडा तयार करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST2021-05-18T04:20:22+5:302021-05-18T04:20:22+5:30
म्युकरमायकोसिसचा वाढता प्रादुर्भाव ही धाेक्याची घंटा मानली जात आहे. या आजाराची लागण झाल्यास रुग्णाच्या जिवाला धाेका निर्माण हाेताे. ...

म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव; आराखडा तयार करा !
म्युकरमायकोसिसचा वाढता प्रादुर्भाव ही धाेक्याची घंटा मानली जात आहे. या आजाराची लागण झाल्यास रुग्णाच्या जिवाला धाेका निर्माण हाेताे. त्यामुळे यासंदर्भात आ़. रणधीर सावरकर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी या आजाराची गंभीरता लक्षात आणून दिली. त्यावर म्युकरमायकोसिसविषयी आरोग्यमंत्र्यांशी बोलून आवश्यक इंजेक्शन्स २१ दिवस निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली असल्याचे केंद्रीय मंत्री ना़. संजय धाेत्रे यांनी सांगितले. या इंजेक्शनसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. या आजारावरील इंजेक्शन व औषधांसाठी राज्य शासन व आरोग्य सचिवांकडे मागणी केली असून त्यांनी ही विनंती मान्य केली असल्याचे ना़. धाेत्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आजाराविषयी जिल्ह्यात आयएमएने पुढाकार घेऊन अद्ययावत सुविधांची आखणी करावी, त्यासाठी शासकीय रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष उभारावा, याचबरोबर जनजागृतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना व आरोग्य संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना ना़. धोत्रे यांनी करून सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.