रेल्वे खाली आल्याने इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:19 IST2017-10-16T13:19:30+5:302017-10-16T13:19:49+5:30

रेल्वे खाली आल्याने इसमाचा मृत्यू
बोरगाव मंजू - पोलीस ठाणे हद्द येणार्या अन्वी मिर्झापुर रेल्वे लाईन वर रेल्वे खाली आल्याने एका 56 वर्ष इसमाचा मृत्यू झाल्याची धटना रविवारी रात्री दरम्यान उघडकीस आली. पोलीसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार रेल्वेमार्ग अपडाउन पोल क्रमांक 73 गेट नंबर 44 नजीक अन्वी मिर्झापुर नजीक रेल्वे खाली आल्याने एका इसमाचा मृत्यू झाला अशी माहिती रेल्वे कर्मचारी यांनी पोलिसात तक्रार दिली वरुन धटना ठिकाणावर पोलिसांनी धाव घेतली. व धटना ठिकाणाचा व मृतदेहाचा पंचनामा केला असता सदर मृतदेह हा ज्ञानदेव विक्रम वानखडे वय 56 वर्ष रा . अन्वी मिर्झापुर असे नाव निष्पन्न झाले. वरुण पोलीसांनी पोलीस दफ्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस करीत आहेत,