विज्ञान खेळणी कार्यशाळेचे आयोजन
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:01:53+5:302014-05-11T00:04:16+5:30
लोकमत बाल विकास मंचचा उपक्रम

विज्ञान खेळणी कार्यशाळेचे आयोजन
अकोला : विज्ञान किंवा शास्त्र म्हटले की, मोठमोठी समीकरणे आणि अवाढव्य नियमावली डोळय़ांसमोर येते. त्यामुळे विज्ञानातील नियमांच्या शब्दजंजाळात निरनिराळे प्रयोग करण्याची मुलांची उत्सुकता तशीच दबून राहते; परंतु आपल्या दररोजच्या जगण्यातूनच आपण सहजतेने विज्ञान शिकू शकतो. याच अनुषंगाने लोकमत बाल विकास मंच अगदी हसत वैज्ञानिक नियमांच्या स्पष्टीकरणासहीत ह्यविज्ञान खेळणीह्ण कार्यशाळेचे आयोजन १९ ते २२ मे दरम्यान करण्यात आले आहे. ही चार दिवसीय कार्यशाळा श्री सर्मथ पब्लिक स्कूल, बारा ज्योतीर्लिंग मंदिराजवळ, रणपिसेनगर, अकोला येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत करण्यात आले आहे. इयत्ता ३ ते १0 वी पर्यंतचे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेत प्रा. प्रदीप खरे अगदी गमतीने टाकाऊ वस्तूंपासून घर्षणबल, गुरुत्वमध्य, स्मृतीमध्य, दृष्टीसातत्य, अशा अनेक वैज्ञानिक नियमांच्या स्पष्टीकरणासहीत वैज्ञानिक खेळणी बनवायला शिकविणार आहेत. या चार दिवसीय कार्यशाळेत वैज्ञानिक तत्त्वावर आधारित विज्ञान खेळणी स्वत: मुलांकडून बनवून घेतली जातील. तर मग आजच आपल्या पाल्याला या गमतीदार वैज्ञानिक उपक्रमात सहभागी करून घ्या. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लोकमत बाल विकास मंच सदस्यांकरिता शुल्क रु. ४00 व इतरांकरिता शुक्ल रु. ५00 आकारण्यात येणार असून, नाव नोंदणीकरिता लोकमत शहर कार्यालय अकोला येथे नोंदणी अर्ज भरून द्यावा. अधिक माहितीकरिता बाल विकास मंच संयोजक योगेश पाटील यांच्याशी ९९७0४५७७६0 क्रमांकावर संपर्क साधावा.