जैन मुनींच्या सान्निध्यात चतरुमासाचे आयोजन
By Admin | Updated: July 7, 2014 00:55 IST2014-07-07T00:44:45+5:302014-07-07T00:55:04+5:30
महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ चतरुमासाचे आयोजन करण्यात आले आहे.

जैन मुनींच्या सान्निध्यात चतरुमासाचे आयोजन
अकोला : आचार्य १0८ कर्मविजयानंदजी महराजांचे शुक्रवार ४ जुलै रोजी न्यू खेताननगर, कौलखेड भागातील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात आगमन झाले आहे. महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ चतरुमासाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १३ जुलै रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान शांतीविधान पूजा होणार आहे तर रविवार, ४ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत मंगल कलश स्थापना करण्यात येणार आहे. याशिवाय दररोज सकाळी अभिषेक पूजन झाल्यानंतर ८.३0 ते ९.३0 दरम्यान महाराजांचे मांगलिक प्रवचन होणार आहे. रविवारी १४ जुलै रोजी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. यानंतर ४ वाजता महाराजांचे विशेष प्रवचन होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जगदीश वालचाळे, पद्माकर गवारे, महावीर खंडारे, चंद्रशेखर रावणे, सुरेश राळेकर, रत्नकुमार गडेकर, सुरेश मेहेत्रे, प्रशांत सैतवाल, किशोर फुरसुले, प्रवीण अंबरकर, स्वप्निल रोम, किशोर येळवणकर, प्रभाकर इंदाने, रवींद्र उन्होने, महावीर आगरकर, नंदू गवारे, राजू माहोरे, श्रीराम इंगोले यांच्यासह दिगंबर जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.