अकोल्यातील आदर्श गोसेवा प्रकल्पात गोपाष्टमी महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:11 PM2017-10-23T14:11:46+5:302017-10-23T14:12:41+5:30

अकोला-पातूर मार्गावरील म्हैसपूर फाटा परिसरातील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प येथे शनिवार, २८ आॅक्टोबर रोजी गोपाष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing Gopashthmi Festival in Akola Gosave Project in Akola | अकोल्यातील आदर्श गोसेवा प्रकल्पात गोपाष्टमी महोत्सवाचे आयोजन

अकोल्यातील आदर्श गोसेवा प्रकल्पात गोपाष्टमी महोत्सवाचे आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्देवैज्ञानिक सिंग व वेदांताचार्य हरिचैतन्यजी महाराज यांचे लाभणार मार्गदर्शन 

अकोला : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अकोला-पातूर मार्गावरील म्हैसपूर फाटा परिसरातील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प येथे शनिवार, २८ आॅक्टोबर रोजी गोपाष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.२८ आॅक्टो. रोजी सकाळी ७ .३० वा. आदर्श गोसेवा प्रकल्प ,म्हैसपूर फाटा येथे या महोत्सवाचा प्रारंभ यज्ञ यजमान राजेश चितलांगे परिवाराच्या विष्णू गोपुष्ठी याग या द्वारे होणार आहे. तत्पूर्वी, गणपती अथर्वशीर्ष आवर्तन होणार आहे. सकाळी ८.३०. प्रकल्प परिसरातून गुरुवर्य आचार्य स्वामी हरिचैतन्यजी महाराज यांच्या उपस्थितीत गोमाता शोभायात्रा निघणार आहे. 
मुख्य सोहळा सकाळी ११.१५ वा. होणार असून, यात बुलढाणा येथील पळसखेड च्या गुरुदेव आश्रमाचे स्वामी आचार्य श्री हरिचैतन्यजी महाराज यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन होणार आहे. या नंतर दिल्ली येथील भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष व वाराणशी येथील बनारस विद्यापीठाचे कृषी वैज्ञानिक डॉ. गुरुप्रसाद सिंग हे गोवंश व कृषी या विषयावर वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत.महोत्सवाची तयारी प्रकल्प संचालक वर्गाच्या वतीने जोरदारपणे सुरु करण्यात आली आहे.महोत्सवात जाण्या-येण्यासाठी शनिवारी सकाळी ९.३० वा.स्थानीय वसंत टॉकीज परिसरातून गोप्रेमी महिला पुरुषांसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. या गोपाष्टमी महोत्सवात सर्व गोपेमी महिला पुरुषांनी आपल्या कुटुंबासमवेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आहवान आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पच्या सर्व संचालकांनी केले आहे.

Web Title: Organizing Gopashthmi Festival in Akola Gosave Project in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.