आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे भजन संध्येचे आयोजन
By Admin | Updated: May 11, 2014 18:50 IST2014-05-11T18:35:59+5:302014-05-11T18:50:17+5:30
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका चित्रा रॉय यांचा सहभाग

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे भजन संध्येचे आयोजन
अकोला : आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका चित्रा रॉय यांच्या भजन संध्येचे आयोजन १८ मे रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
तणावमुक्त आणि हिंसामुक्त जीवन जगण्यासाठी प.पू. श्री.श्री. रविशंकर यांनी साधना, सेवा व सत्संग या त्रिसूत्रींचा अवलंब करण्याचा संदेश दिला आहे. या पृष्ठभूमीवर पिम विदर्भात प्रथमच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका चित्र रॉय यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. भजन संध्या रविवारी संध्याकाळी ६.३० वा. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. भजन संध्येमध्ये नि:शुल्क प्रवेश राहणार आहे. रॉय यांनी शास्त्रीय संगीत विषयात एम.ए व एम.फिल. अभ्यासक्रम करून सुवर्णपदकही प्राप्त केले आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे ग्वालियर घराण्याचे पू. श्री. लक्ष्मण कृष्णराव पंडित यांच्याकडून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये २००७ मध्ये येथे संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संगीत क्षेत्रात प्रथमच २०० कलाकारांनी एकाच वेळी एकाच मंचावर कला सादर केली होती. तसेच २००८ मध्ये नोएडा येथे ब्रानाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १००० पेक्षा जास्त सतार वादक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. चित्रा यांचे भारतातच नव्हे तर डेन्मार्क, फ्रान्स, ऑस्ट्रीया, नेदरलंॅड, जर्मनी, फिनलँड, नेपाळ येथे भजन संध्येचे कार्यक्रम झाले आहेत.